नाशिक प्रतिनिधी - मधुमेह हा तसा म्हणायचा झाल्यास जुना आजार आहे आणि या आजाराने जगभरात अनेकांना ग्रासले आहे. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास रक्तामधील

नाशिक प्रतिनिधी – मधुमेह हा तसा म्हणायचा झाल्यास जुना आजार आहे आणि या आजाराने जगभरात अनेकांना ग्रासले आहे. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढले की मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. डॉ. रमण गोयल, मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयातील मधुमेह आणि बॅरिएट्रिक सल्लागार शल्यचिकीत्सक म्हणाले की,टाईप-1 आणि टाईप-2 हे मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारचे मधुमेह हे रक्तातील साखर वाढल्याने होत असले तरी तो होण्यामागची कारणे आणि त्यावरील उपचार पद्धती या भिन्न आहेत.जून 2023 मध्ये, द लॅन्सेट डायबेटीस अँड एंडोक्रिनोलॉजी जर्नलमध्ये एक शोधअभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की 11.4 टक्के भारतीयांना मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, भारतात 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अंदाजे 77 दशलक्ष (7.7 कोटी) व्यक्तींना सध्या टाइप 2 मधुमेहाचा त्रास आहे तर 25 दशलक्ष (2.5 कोटी) व्यक्ती या मधुमेह होण्याच्या उंबरठ्यावर असून नजीकच्या काळात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता दाट आहे.
मधुमेहाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार असतात टाईप-1 आणि टाईप-2. यातल्या पहिल्या प्रकारचा मधुमेह हा 10 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. या प्रकाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या ही तुलनेने कमी असते. आकड्यांमध्ये सांगायचे झाले तर या प्रकारचा मधुमेह झालेल्या रुग्णांची संख्या ही सुमारे 10% -15% असते. या प्रकारच्या मधुमेहामुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींना नष्ट करत असते. टाईप-2 मधुमेहाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही टाईप-1च्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. जवळपास 85 टक्के मधुमेहाचे रुग्ण या प्रकारामुळे ग्रासलेले असतात. टाईप-2मधुमेहाची लागण ही प्रौढांना होत असते. या प्रकारच्या मधुमेहाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होते मात्र त्याला अडथळा निर्माण झाल्याने इन्सुलिनचे शरीरातील कार्य नीटपणे होत नाही ज्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते.
COMMENTS