Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दि. बा. पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार दि. बा. पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धकका; गुंतवणुकदार चिंतेत
माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार दि. बा. पाटील यांची अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे रविवार, दि. 30 ऑक्टोंबर रोजी पन्हाळगडावरती दुसरे अखिल भारतीय शिव-मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी दिली आहे. आजवर विविध विषयावर अनेक कथा कादंबर्‍या लिहून दि. बा. पाटील यांनी मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. संगळी व कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य चळवळ वाढीसाठी त्यांनी अनेक साहित्य संमेलने आयोजित करून भरीव काम केले आहे. शिवाय मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार त्यांच्या आजवरच्या साहित्यकृतींना मिळाले आहेत.

COMMENTS