Dhule : पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला .. शोधकार्य सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Dhule : पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला .. शोधकार्य सुरू

अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणा

FILMY MASALA : अनन्या पांडेच्या घरी एनसीबीची धाड, बॉलिवूड पुन्हा हादरलं (Video)
केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे : नाना पटोले
व्हॉट्सअ‍ॅपने केले 74 लाख अकांऊट बॅन

अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी दोघ तरुण बचावले असून त्यांपैकी एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.

परिसरातील नागरिकांनी या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अद्यापही हा तरुण सापडला नाहीये.

प्रशासनातर्फे पांजरा नदी मध्ये पोहण्यासाठी जाऊ नये अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत हौशी तरुणांनी पोहण्यासाठी पांजरा नदीमध्ये उड्या टाकल्या परंतु या तिघांपैकी दोघ तरुण सुखरूप बाहेर आले असून तिसऱ्या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही तरुणाचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही आहे. .

COMMENTS