औरंगाबाद प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक

औरंगाबाद प्रतिनिधी – राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक्यातील अमदाबाद येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने अडचण निर्माण झाली. नदीच्या पात्रात चिता रचून पेटवली. त्यानंतर लगेच पावसाचे आगमन झाले. यानंतर नदी दुथडी भरून वाहू लागले. जळती चिता वाहून गेली तर काय होईल, अशी चिंता नातेवाईकांना होऊ लागली होती. मात्र, सुदैवाने तशी दुर्घटना घडली नाही. स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
COMMENTS