शेतकऱी आणि शेतमजूराचं आयुष्य जगलेल्यांना तसंच ग्रामीण भागातील जनतेला हे ठामपणे माहित असतं की, ज्वारी-बाजरीचं पीक काढल्यानंतर त्याची खुंटे शेतात उ

शेतकऱी आणि शेतमजूराचं आयुष्य जगलेल्यांना तसंच ग्रामीण भागातील जनतेला हे ठामपणे माहित असतं की, ज्वारी-बाजरीचं पीक काढल्यानंतर त्याची खुंटे शेतात उरतात; त्यालाच ‘धस’ म्हटलं जातं. हे धस एका जागेवर गडून असले तरी, चुकून कधी या धसाला पाय किंवा अंगाचा स्पर्श झालाच तर जखम होण्याचा धोका असतो. या जखमेची लवकर दुरुस्त होण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे, ग्रामीण लोकं धस’चा धसका घेत नसले तरी तो धसाला लाथाळतही नाहीत! पण, महाराष्ट्रात एका धसा’चा असाच धसमुसळेपणा सुरू आहे. ज्यांच्यावर लांच्छनास्पद आरोप करायचे, त्यांच्याच भेटीला रात्रीच्या अंधारात जायचे आणि लोकांमध्ये त्याविषयी ब्र शब्द काढायचा नाही; असा दुटप्पीपणा करायची सवय लागलेली. परंतु, राजकारण कोळून प्यालेले बावनकुळे यांनी मात्र, धसा’चा बाणाच उपटून काढला! जेणेकरून धसाचा गांजणारा गुणधर्म उखडला गेला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक कसलेलं नेतृत्व आहे. आपल्याच मंत्रीमंडळातील एका सहकाऱ्याला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तिला कसं धसपटलं हे आख्या महाराष्ट्राने पाहिले. एका बाजूला मंत्र्यांवर बेछूट आरोप करायचे. ज्याय लढा देण्यापेक्षा सुपारी घेतल्यासारखे वर्तनच महाराष्ट्राने अधिक पाहिले. महाराष्ट्राची सत्ता गेली साठ वर्षे ज्यांनी भोगली त्यांनी महाराष्ट्राची काय कमी वाट लावली काय. एकजातीय सत्तेच्या अति आत्मविश्वासाने वावरणाऱ्या सत्ताधारी समुहाला मुंढे यांच प्रतिनिधित्व सतावतं. त्याचं कारणही नेमकं तसंच आहे. महाराष्ट्र मंत्रीमंडळात एकूण संख्येत ओबीसी मंत्र्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्र मंत्रीमंडळात पहिल्यांदाच असं घडलं की, राज्यात मराठा समुदायायेपक्षा ओबीसींची संख्या अधिक आहे. अर्थात, याचं संपूर्ण श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.राज्यात त्यांनी खऱ्या अर्थाने, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागिदारी, हे तत्त्व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचे गठन करताना अंमलात आणले आहे. राज्याचे जातीय समीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच सुरूंग लावला. याचा आनंद महाराष्ट्रात सर्व जातीसमाजांना झाला. परंतु, काही प्रवृत्ती मात्र, या निर्णयामुळे दुखावल्या गेल्या आहेत! मग, त्या दुखावलेल्या प्रवृत्तींनी त्यांच्या आकाच्या इशाऱ्यावर एका ओबीसी मंत्र्याला घेरले आहे. त्यांचे एकच म्हणणे आहे की, ओबीसी मंत्र्याने राजीनामा द्यायला हवा. परंतु, राज्याचे धुरंधर नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूध का दूध आणि पाणी का पाणी चांगलं कळतं. त्यामुळे, गेली तीन महिनेपेक्षा अधिक काळापासून ओबीसी मंत्र्याचा राजीनामा मागितला जात असताना, मुख्यमंत्री त्या मंत्र्याला आपला पक्षाचा नसला तरीही, मंत्रिमंडळातून काढायला तरार नाहीत.याचे महत्वाचे कारण, माणसे एका रात्रीत घडविता येत उ. एका नेतृत्वाला घडवताना कित्येक वर्षाचा काळ, बुध्दी आणि पैसाही खर्च करून व्यक्तिमत्त्व बनविले किंवा घडविले जाते. परंतु, जे आपल्या आकांच्या जीवावर आमदार, खासदार, मंत्री होतात त्यांना याविषयी फारशी संवेदनशीलता असण्याचे कारण संभवत नाही. एका प्रकरणाने महाराष्ट्र डोक्यावर घेणाऱ्यांना गेल्या साठ वर्षांच्या सत्तेचा जाब विचारला तर, महाराष्ट्राच्या भूमीतून आर्त किंकाळ्या शिवाय, दुसरं काहीही आपल्या कानी पडणार नाही. ग्रामीण भागातील दलित, आदिवासी, ओबीसी वस्त्यांना ज्यांनी अन्याय-अत्याचाराच्या राजधान्या करून ठेवल्या आहेत, त्यांनी दलित, आदिवासी आणि ओबीसींवर होणाऱ्या सामाजिक अन्याय-अत्याचाराच्या विरोधात कधी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले नाही! धसांचे आका निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. कारण, फडणवीस हे कार्यमग्न मुख्यमंत्री आहेत. त्यांना आका बनण्यास हौसही नाही आणि वेळही नाही!
COMMENTS