Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या साठी आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन

बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात काही शेतकर्‍यांना सरकार कडून कर्ज माफी देण्यात आली किंवा काही शेतकर्‍यांचे वन टाईम सेटलमेंट अ

जामखेडमध्ये जुन्या भांडणातून कोयत्याने वार
निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक
अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात काही शेतकर्‍यांना सरकार कडून कर्ज माफी देण्यात आली किंवा काही शेतकर्‍यांचे वन टाईम सेटलमेंट अंतर्गत कर्ज भरून घेण्यात आले. परंतु कर्ज माफीतील आणि वन टाईम सेटलमेंट अंतर्गत कर्ज भरलेल्या शेतकर्‍यांना आता बँका सिबिल ची अट पुढे करून कर्ज पुरवठा करण्यास तयार नाहीत. अजूनही यावर केंद्र सरकार किंवा बँकाकडून पर्याय काढण्यात आलेला नाही. तसेच आता च्या पिक कर्जात फळ बाग, ओलिताची शेती किंवा कोरडवाहू शेती असे अनेक निकष लावून कर्ज मर्यादा ठरविण्यात येते. म्हणजेच एकाच राज्यात पुणे किंवा नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍याला जर एकराला दोन लक्ष कर्ज दिल्या जात असेल तर मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेती असलेल्या भागातील शेतकर्‍यांना अल्प प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. शेतीचा उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरडवाहू शेतीला सुद्धा फारमोठ्या प्रमाणात लागवडीचा खर्च येतो, त्या आधारे हेक्टरी किमान कर्ज मर्यादा वाढविण्याची गरज आहे. तसेच बँका कर्ज पुरवठा करतांना शेतकर्‍यांना खूप सगळ्या अटीची पूर्तता करायला लावतात, जास्त किंमतीचे स्टॅम्प पेपर्स खरेदी करायला लावतात, त्यामुळे कर्ज घेण्यासाठी सुद्धा शेतकर्‍याला खाजगी सावकाराकडे जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणून सुद्धा राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत, त्यांना बँका कर्ज द्यायला तयार नाहीत.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे शेतीला दिवसा सलग 10 -12 तास वीज पुरवठा करण्यात यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. तर वन्य प्राण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान शासनापासून लपून नाही, यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. शेती व शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टी राज्यभर मंगळवार दिनांक 2 मे, 2023 रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन संविधानिक मार्गाने आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी 11.00 करण्यात आलेया हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढील आंदोलने तीव्र होतील याची सर्वस्वच्छ जबाबदारी हे प्रशासनाची असेल प्रमुख मागण्या शेतकर्‍यांचे बँकांनी होल्ड केलेले खाते तात्काळ चालू करा शेतकर्‍यांना सिविल ची आट घालून पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत अशा बँकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी शेतकर्‍यांच्या घरामध्ये कापूस सोयाबीनचा भावा अभावी पडून आहे त्यावरती बोनस जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करण्यात यावी अवकाळी पावसामुळे जनावरांच्या चार्‍याची अडचण भासणार आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आढावा घेण्यात यावा  विद्युत महामंडळाची उ-ॠ मार्फत चौकशी करून ऑडिट करण्यात यावे व शेतकर्‍यांना 12 तास लाईट मोफत देण्यात यावी मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात वाटर ग्रिड योजना राबविण्यात येणार होती त्याचं काय झालं खते / बियाचे वाढलेले अतोनात भाव  वापस घेण्यात यावेत शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव देण्यात यावा या आम आदमी पार्टीच्या आंदोलनामध्ये माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष भिमराव कुठे शहर अध्यक्ष सय्यद सादेक तालुका उपाध्यक्ष अजून खान युवक जिल्हा संघटन मंत्री प्रवीण पवार मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई डोंगरदिवे देवा गुंजाळ रामेश्वर गव्हाणे पिंपळनेर सर्कल प्रमुख दादासाहेब सोनवणे युवा नेते माऊली शिंदे सुरेश नागरगोजे

COMMENTS