Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

पाथर्डी ः पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेत किमान वेतन देऊन त्यांना विम्याचे संरक्षण द्यावे या मागणीसाठी आहे आरोग्य विभागात कं

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात अव्वल
दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप
टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

पाथर्डी ः पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेत किमान वेतन देऊन त्यांना विम्याचे संरक्षण द्यावे या मागणीसाठी आहे आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 26 कर्मचार्‍यांनी पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान आंदोलकाशी मुख्याधिकारी लांडगे यांनी चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी गुरुवारी नगर येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.अखेर नगर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी जाहीर केला.या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र कसबे व सचिव सागर दिनकर यांनी केले. पालिकेचा स्वछतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने कामावरून काढून टाकल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने आपल्याला पुन्हा एकदा सेवेत घ्यावे या साठी आज कसबे व दिनकर यांच्यासह अनिकेत ननावरे, सचिन मोहिते, पोपट शेकडे, लक्ष्मण बालवे, मंदा दिनकर, वैशाली वैरागळ, पूजा कांबळे, साखरबाई दिनकर, अनिता दुबळे यांच्यासह सर्व कामगारांनी पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. या वेळी बोलताना कसबे म्हणाले कि शासनाने जे वेतनासंदर्भात नियम घालून दिले आहे त्या पद्धतीने आम्हाला वेतन न मिळता केवळ सात हजार रुपये महिन्याला दिले जाते.या वेतनातून संसार कसा चालवायचा हा प्रश्‍न पडला आहे.आम्हाला पुन्हा एकदा कामावर घेऊन किमान वेतन द्यावे,आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला विम्याचा लाभ मिळायला हवा. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS