Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः  मुंबईत नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौर

शरद पवारांचा पुन्हा यू टर्न
…तर, उद्धव ठाकरेंना कफनचोर म्हणावे लागेल
इथेनॉल बंदी उठवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करू

मुंबई/प्रतिनिधी ः  मुंबईत नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, उष्माघातामुळे या सोहळ्यात 14 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संभाजी ब्रिगेडने अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी केली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी (दि.16) झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावरुन राजकारण तापले असून विरोधकांकडून सत्ताधार्‍यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते हर्षल बागल यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कार परत करावा अशी मागणी केली आहे. हर्षल बागल यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अटट्हासामुळे हे मृत्यू झाल्याचे बागल यांनी म्हटले आहे. सचिन खरात यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांचे उदाहरण देत पुरस्कार परत करण्याचा सल्ला दिला आहे. सचिन खरात म्हणाले, निळू फुलेंनी त्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेतला नव्हाता. या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणताही पराक्रम केलेला नाही. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो, असे म्हणत पुरस्कार नाकारला होता. आपणही याची आठवण ठेवून पुरस्कार परत करावा, अशी मागणी खरात यांनी केली आहे. हर्षल बागल म्हणाले, अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कार परत करावा. तर नैतिकता दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. नवी मुंबईतल्या खारघर येथे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सोहळ्यात आलेल्या 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला. मृतात दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. उष्माघाताने हे मृत्यू झाल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला. या मृतांचे शवविच्छेदन अहवाल आलेत. त्यात बारा मृत साता तासांपासून उपाशी असल्याचे समोर आले आहे. अनेकांना विविध व्याधी होत्यात. त्यात उन्हाचा फटका. त्यामुळे हे मृत्यू झाल्याचे समजते.

COMMENTS