Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनजंय जाधव शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी

पुणतांबा प्रतिनिधी ः शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र राज्य शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणतांबा येथील धनंजय भास्करराव जाधव यांची निवड केल्याचे राज्

शिवसेनेची सत्ता असलेल्या नगर महानगरपालिकेचा थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘सामना’ला दणका l LokNews24
मुळाच्या पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार लवकरच
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर

पुणतांबा प्रतिनिधी ः शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र राज्य शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणतांबा येथील धनंजय भास्करराव जाधव यांची निवड केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे यांनी मुंबई येथील शेतकरी सेनेच्या कार्यक्रमात जाहीर केले जाधव यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचे निवडीमुळे पुणतांबेकरांचे नाव राज्याच्या राजकारणावर अधोरेखित झाले आहे.
शिवसेना प्रणित शेतकरी सेना याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबई येथे केली यावेळी प्रदेशाध्यक्षपदी म्हणून पुणतांबा येथील धनंजय भास्करराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी नाथाभाऊ कराड यांची निवड केल्याचे जाहीर केले.शेतकरी सेनेची स्थापना करून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पक्षाची शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी स्थापना केली. मुंबई येथील जाहीर कार्यक्रमात शेतकरी सेनेची स्थापना करून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले असून राज्यात शेतकरी सेनेची मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरची जबाबदारी टाकली ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करून शेतकरी समृद्ध होईल यासाठी प्रयत्न करून काम करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच, पुणतांब्यात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. धनंजय जाधव यांनी 2017 रोजी झालेल्या शेतकरी संपामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडली होती त्यामुळे जाधव यांचे नाव राज्यात गाजले होते किसान क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांसाठी विविध आंदोलने केली होती त्याची दखल घेण्यात आली असून जाधव यांची शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पुणतांबेकरांच्या वैभवात भर पडली आहे. उपाध्यक्षपदी नाथाभाऊ कराड यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी शेतकरी सेनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला शेतकरी वर्ग कार्यकर्ते व महिला यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी हंसराज वडघुले, योगेश रायते, सुधाकर जाधव, सर्जेराव जाधव, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, सोपान धनवटे, प्रशांत राऊत, प्रणित शिंदे, दत्तात्रय बोर्डे, मधुकर घोडेकर, दत्तात्रय सुरडकर, विजय जाधव, योगेश ठाकरे, अशोक धनवटे तसेच निकिता जाधव रूपाली जाधव आदी महिला उपस्थित होत्या.

COMMENTS