Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाडगेवाडी शाळेतील स्नेहसंमेलन उत्साहात

सुपे/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील धाडगेवाडी येथे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंभेलन अगदी उत्साहात साजरे करण्या

प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत
भाजपमध्ये गेल्याने विखेंना येते शांत झोप..पालकमंत्री मुश्रीफांनी लगावला टोला
अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण

सुपे/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील धाडगेवाडी येथे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंभेलन अगदी उत्साहात साजरे करण्यात आले. स्नेहसंभेलनात, पौराणिक, धार्मिक संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न, येथील चिमुकल्या लहान मुला-मुलींनी आपल्या नाट्यछटा कार्यक्रमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात अनेक देश भक्तीपर गिते, सामाजिक बांधिलकीची जोपासना कशी करावी हे कार्यक्रमाच्या माध्यमतून दाखवण्यात आले.
स्नेह संभेलनात जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतुने धाडगेवाडी येथे पूर्वी कार्यरत असलेले कै.मगर सर यांच्या स्मरनार्थ -सावतामाळी मित्र मंडळाच्या वतीने शाळेच्या नावाचा स्टील बोर्ड देण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब बुगे (गट शिक्षणाधिकारी), गोकुळ कळमकर (शिक्षक नेते), संतोष मगर, सुर्यकांत काळे, कारभारी बाबर, दत्तात्रय ठुबे, तालुक्यातील शिक्षकवृंद, रांजणगाव येथील सरपंच बंटी साबळे, सुवर्णाताई धाडगे, (राष्ट्रवादी महीला अध्यक्षा), सचिन मेहेत्रे (अध्यक्ष स्कूल कमेटी), मोहण मेहेत्रे, राजु पवार, मनोहर साबळे, दिलीप गाढवे, संतोष धाडगे, ज्ञानेस्वर गाढवे, सावता माळी मित्र मंडळ, अहिल्याबाई मित्र मंडळाचे सर्व सभासद, व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, व आभार  मगर यांनी केले.

COMMENTS