देवेंद्र फडणवीस : यशस्वी किंगमेकर

Homeताज्या बातम्यासंपादकीय

देवेंद्र फडणवीस : यशस्वी किंगमेकर

यशस्वी सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्राचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज महाराष्ट्रातील जनतेसह देशाच्या राजकीय धुरीणांचा होता; परंतु, या अंदाजा

डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवीदान
शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर ?
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य नको ः राज ठाकरे

यशस्वी सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्राचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज महाराष्ट्रातील जनतेसह देशाच्या राजकीय धुरीणांचा होता; परंतु, या अंदाजाला धक्का देत आणि स्वतःच्याच ’मी पुन्हा येईन,’ या घोषालाही त्य धक्का देऊन राज्याच्या किंगमेकरच्या भूमिकेत प्रवेश करणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात किती मोठेपणा ठेवून काम करावं, याचा आदर्श आज घालून देत, स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याची घोषणा करून राज्याचे नवे मुख्यमंत्रीपद थेट एकनाथ शिंदे यांनाच बहाल केले. राज्याचे मुख्यमंत्री पद दुसर्‍यांदा चालून आले असताना त्यास सहजपणे सोडून देणे भारतीय राजकारणात फारच अभावाने दिसणारी ही बाब, त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात आणली. 2019 च्या निवडणुकीत ’ मी पुन्हा येईन,’ अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात शतकपार नेऊन ठेवले; तरीही, शिवसेनेच्या असहकार्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित रहावे लागले होते. राज्यात दोन पक्षांचे मिळून होणार नाहीत, एवढे आमदार फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडे असताना देखील सत्तेच्या बाहेर रहावे लागणे हे कोणत्याही कतृत्वसंपन्न नेत्यांसाठी आव्हान असते. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाल्यापासून अस्वस्थ असणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदावर बसून आपल्या राजकीय शक्तीचा ठसा उमटवत राहिले. ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या कारणास्तव मंत्रीमंडळातून डच्चू देण्यास भाग पाडले किंवा तुरुंगात चार भिंतींच्या आड त्यांची रवानगी केली. अनिल देशमुख, नवाब मलिक, अशी अनेक नावे राज्याच्या राजकारणात बंदीवान झाले. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या नंतर सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पटकावला; पण त्याहीपेक्षा ते आता किंगमेकर च्या भूमिकेत खूपच कमी वयात आले. शरद पवार यांना किंग मेकर कधीच बनता आले नाही. नाही म्हणायला केंद्रीय सत्तेत जाताना ते आपला वारसा मुख्यमंत्री पदावर नेमून जात. परंतु, अशाच नेमणूकीनंतर प्रभावीपणे कामकाज करायला लागताच पवार यांनी सुधाकरराव नाईक यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला होता, हे जाहीर आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे पवार यांच्या खूपच पुढे गेले. चालून आलेल्या सत्तेत सामिल न होता सत्ता बाहेर राहण्याची त्यांची भूमिका ही किंगमेकरला साजेशी आहे! सत्तासंघर्ष काळात राज्यातील जनतेला वाटले होते की, स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची धडपड सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात सत्ता स्थापनेचा क्षण आल्यानंतर त्यांनी सत्तेतून बाहेरच राहण्याचा घेतलेला निर्णय राज्याला त्यांच्याविषयी अभिमान वाटेल असाच आहे. मुख्यमंत्री बनून मर्यादा येतील म्हणून राज्यात आगामी काळात होऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील बहुतांश महापालिका भाजपाच्या ताब्यात आणण्यासाठी फडणवीस जिवाचे रान करतील, हे आता उघड आहे. फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका शिवसेनेच्या कब्जातून सोडवायची आहे. त्यामुळे, शिवसेनेवर कब्जा करून महापालिका घ्यावी असा त्यांचा होरा असावा. एकनाथ शिंदे यांनी अधिकृत शिवसेना आपलीच, असा दावा केला आहे. त्यांना मुख्यमंत्री करून फडणवीस यांनी दोन बाबी साध्य केल्या; त्यातील पहिली म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविणे आणि त्यांच्यासोबत मिळून मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. सत्तेत राहण्यापेक्षा आपल्या पक्षाला अधिक बलवान बनविण्याची त्यांची भूमिका ही राजकारणातील खर्‍या किंगमेकरची भूमिका आहे! खरेतर, देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी सत्तासंघर्षानंतर सत्तेपासून दूर परंतु, एका राजकीय उंचीवर नेऊन ठेवले! मात्र पक्षाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना फोन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासा सांगितल्यामुळे, पक्षाचा एक सच्चा, निष्ठावान शिपाई म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या मनाचा मोठेपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला.

COMMENTS