Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील ः कोल्हे

मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधीः माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विकासाची कामे कर

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे ः प्रा. बाबा खरात
गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही
समृद्धी महामार्गामुळे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधीः माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विकासाची कामे करत आहेत. यापुढील काळातही येसगावच्या विकासाची वाटचाल अशीच कायम सुरू राहील. यासाठी ग्रामपंचायतला कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही भाजप नेत्या  व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या मा.आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत बग्गी रोड (दत्त मंदिर) वर पथदिवे बसवणे (10 लाख रुपये), गावठाण रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे (10 लाख रुपये), गोरखनगरमध्ये गटार बांधणे (9 लाख रुपये), गोरखनगरमधील रस्ता काँक्रिटीकरण करणे (6 लाख रुपये), येसगाव येथील शिंगणापूर वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (12 लाख रुपये), पाईक वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (16 लाख रुपये), गावठाण अंतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण करणे (15 लाख रुपये) अशा विविध विकासकामांचा शुभारंभ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण निधीतून जवळपास 38 ते 40 लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप, समाजकल्याण विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना एलईडी बल्बचे वितरण तसेच अंगणवाडी केंद्रामार्फत गरोदर माता आणि लहान बाळांचे वजन करण्यासाठी वजनकाट्याचे वितरण देखील करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, येसगावात रस्ते, पाणी, पथदिवे, गटार, पेव्हर ब्लॉक, सिमेंट कॉँक्रिट रस्ते व इतर विविध विकासकामे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आहे. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचा विकासाचा विचार पुढे नेत ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थांचे प्रश्‍न व अडीअडचणी सोडवण्याबरोबर गावच्या विकासासाठी काम करत आहे. येसगाव ही माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. येसगावच्या प्रगतीमध्ये स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे मोलाचे योगदान आहे. येसगाव येथील ग्रामस्थांच्या समस्या व विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी माझ्यासह संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांचे येसगाव ग्रामपंचायतला नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. भविष्यातदेखील येथील विकासकामांसाठी कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समूह यांच्याकडून ग्रामपंचायतला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. येसगावच्या विकासाचे व्रत घेऊन येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य प्रामाणिकपणे काम करत आहेत, याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले. येसगाव यापुढेही विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर रहावे आणि स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, राजेंद्र कोल्हे,सचिन कोल्हे, सुधाकर कुलकर्णी, गोरख आहेर, बापूसाहेब सुराळकर, शिवाजी कोकाटे, शंकरराव पाईक, उत्तमराव पाईक, कपिल सुराळकर, अमोल झावरे, राजेश आहेर, ज्ञानेश्‍वर (बंडू) आदमाने, दत्तात्रय आहेर,चंद्रकांत शिवरकर, गुलाबभाई तांबोळी, दिनेश कोल्हे, अर्जुन लासनकर, भास्कर आहेर, सीताराम पाईक, विष्णुपंत सुराळकर, किरण गायकवाड, अतुल सुराळकर, बाळासाहेब गायकवाड, अक्षय आहेर, ग्रामसेवक गायकवाड आदींसह येसगाव येथील ग्रामस्थ, ग्रा. पं. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS