कोपरगाव: कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे. कोपरगाव शहराचा पा
कोपरगाव: कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याची घेतलेली जबाबदारी पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून पार पाडली असून नागरिकांना दर तीन दिवसाआड पाणी मिळत आहे. भविष्यात दर दिवसा-आड किवा दररोज पाणी उपलब्ध होईल. मतदार संघाबरोबर कोपरगाव शहर देखील विकासाच्या वाटेवर आणण्यात जनतेच्या आशीर्वादाने यशस्वी झालो आहे. यापुढील काळात विकासाच्या प्रश्न सोडविण्याबरोबरच मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबांचा आर्थीक विकास साधण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार अशी ग्वाही देऊन कोपरगावचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले .
कोपरगाव शहरातील शंकरनगर, हनुमान नगर व गांधीनगर आदी ठिकाणी रविवार (दि.17) रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नागरिकांशी संवाद साधतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. या ठिकाणी घेण्यात आलेल्या या सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराचा मिटलेला पाणी प्रश्न, रस्त्यांसह सर्व बाबतीत विकास झाल्यामुळे कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलली असली तरी मला हि आर्थिक उलाढाल अजून वाढवायची आहे. त्यासाठी आपल्या तालुक्याच्या सीमेवर होणार्या एमआयडीसीत लवकरात लवकर नवीन उद्योग आणून मतदार संघातील बेरोजगारांना रोजगार देवून त्यांच्या कुटुंबांची आर्थिक प्रगती मला साधायची आहे. कोपरगाव शहरालगत नवीन एमआयडीसी उभारायची आहे. त्या माध्यमातून खर्या अर्थाने कोपरगावची बाजारपेठ फुलणार असून विकास चक्रासोबत अर्थचक्र देखील अधिक वेगाने फिरणार आहे. मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागले आहे. गोदावरी कालव्याच्या दुरुस्ती साठी निधी मिळवून लाभधारक शेतकर्यांच्या सिंचनाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असून पुढील काळात दुरुस्तीसाठी अधिकचा निधी आणणार आहे.
कोपरगाव मतदार संघाचा झालेला विकास आणि माझ्या विकासाच्या संकल्पना माझे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साक्षीने मतदार संघातील जनतेला सांगितले आहे. आणि त्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतेलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे 2019 ची विधानसभा निवडणूक संपताच मी मतदार संघाच्या विकासाचा श्री गणेशा पहिल्या दोनच महिन्यात 5 नंबर साठवण तलावाचे भूमीपूजन करून केले होते. त्याचीच पुनरावृत्ती हि निवडणूक आटोपताच करणार आहे त्यामुळे निश्चितच मतदार संघाच्या विकासाला वेग येईल. रस्ते वीज पाणी आरोग्य या प्रश्नावर अधिक भर देऊन मुलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत. पुढील काळात उर्वरित विकास कामांना लवकरात लवकर प्रारंभ करून विकासाचे सर्वच प्रश्न निकाली काढणार आहे. मतदार संघातील राहाता तालुक्यातील 11 गावांना विविध विकास कामांच्या माध्यमातून निधी देवून त्या गावांना देखील विकासाच्या वाटेवर आणले आहे. मतदार संघातील जनतेने मला 2019 ला आशीर्वाद दिला व यावेळी देखील देणार आहे याचा मला विश्वास असून हा आशीर्वाद मोठ्या मताधिक्याने द्या यापुढील काळातही मतदार संघाच्या झालेल्या विकासापेक्षा भविष्यात अधिकचा विकास करेल अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यावेळी दिली.
COMMENTS