Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ :डॉ भारती पवार 

दिंडोरी प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा  कार्यक्रम येथील ग्रामपालिकेच्या आवारात आयोजित आयोजित करण्या

प्राथमिक सुविधांच्या उपलब्धतेवर भर -राज्यमंत्री डॉ भारती पवार 
माननीय पंतप्रधान मोदींजींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : डॉ भारती पवार
निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व :- डॉ भारती पवार

दिंडोरी प्रतिनिधी – दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा  कार्यक्रम येथील ग्रामपालिकेच्या आवारात आयोजित आयोजित करण्यात आला होता. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान चिंचखेड ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या या दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना त्वरित सोडवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान महिलांना आयुष्यमान भारत कार्ड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅलेंडरचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बापू पाटील,सतिश मोरे, शाम मुरकुटे, अमोल खोडे,अल्पेश पारख,संगीता मातेरे, शिवानंद संधान, सुभाष मातेरे,सुनील मातेरे,दादासाहेब पाटील, संगीता घिसाडे, प्रवीण संधान ,किरण तिवारी ,दर्शन दायमा,वसंतराव उगले,शिवानंद संधान,पोपट कारंडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS