Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत देव चव्हाणला सुवर्णपदक 

नाशिक प्रतिनिधी - छत्तीसगड मधील रायपुर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिक येथील २० वर्षीय देव महेंद्र चव्हाण याने प्रथम क्रमांक

सलमानच्या घरावर गोळीबार करणारा पाचवा आरोपी अटकेत
अंबाजोगाईत अडखळत बोलणार्‍या मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी
वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

नाशिक प्रतिनिधी – छत्तीसगड मधील रायपुर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिक येथील २० वर्षीय देव महेंद्र चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहेत.नाशिक मधील आर्ट्स फिटनेस क्लब चा तो विद्यार्थी आहेत.सदर स्पर्धेत सहभागी होऊन त्याने सुवर्णपदक पटकावले.सुवर्णपदक प्राप्त करणारा तो सर्वात कमी वयाचा स्पर्धक ठरला आहेत. नाशिकरांची मान उंच करणाऱ्या देव महेंद्र चव्हाण चे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत.देव हा वरीष्ठ पोलिसनिरीक्षक महेंद्र चव्हाण यांचा मुलगा असून त्याचे पोलीस खात्याच्या वरिष्ठांकडून देखील विशेष कौतुक करण्यात आले.तसेच नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. संदिप कर्णिक यांनी देव च्या कुटुंबासह देव चे अभिनंदन केले.

COMMENTS