सातारा / प्रतिनिधी : अनेक सरकार आली-गेली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले असले तरी मास्टर माईंड तथा मुख्य सूत्रधार सापडले नाहीत. हे समा
सातारा / प्रतिनिधी : अनेक सरकार आली-गेली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले असले तरी मास्टर माईंड तथा मुख्य सूत्रधार सापडले नाहीत. हे समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केली.
येथील श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारधारा पुस्तके लोकार्पण व वितरण सोहळा झाला. तेंव्हा डॉ. राजेंद्र माने प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र अंनिस ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्षस्थानी सुकमार मंडपे होते. यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, अंनिस वार्तापत्राचे डॉ. प्रदीप झनकर, अंनिसचे वसंत धुमाळ व प्रकाश खटावकर यांची उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्र माने म्हणाले, विज्ञानवादी झालात तरच विवेकवादी समाज निर्माण होईल. वैज्ञानिक सृष्टी निर्माण झाली की आपसुकच दृष्टी निकोप असेल. संतांनी दिलेल्या विचारावरच महापुरुषांनी समाजास आधुनिक विचार दिले आहेत. मानसिक बळ व श्रध्देवर मानवाने वाटचाल केली पाहिजे. डॉ. दाभोलकर य ांनी शांतपणे परिवर्तनाची लढाई जिंकली होती. तेंव्हा रूढीबरोबरच आक्रमकतेस गाढले पाहिजे. शोषण करण्यापासूनचा लढा डॉ. दाभोलकर यांनी सुरू केला असल्याने निरंतर अंनिस कार्यरत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सोप्या भाषेत सांगणारे विवेकी, साधी राहणी व शांतपणे ऐकून कृतिशील चिकित्सा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत दाखल होऊन प्राथमिक शिक्षण झाले आणि ज्ञानार्जन सुरू केले होते. त्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार घरोघरी 12 पुस्तक लोकार्पण सोहळ्यात शाळेचे समन्वयक राजेंद्र कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून समतेचा विचार कृतीत आणण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. दिपक माने (अंनिस शहर कार्याध्यक्ष) यांनी डॉ. दाभोलकरांचे कार्य, अंनिस इतिहास, देव आणि धर्माबाबत अंनिसची भूमिका व चतुसुत्री सांगितली. उदय चव्हाण यांनी वैज्ञानिक जाणिवा अभियान जिल्हा प्रमुख यांनी बिन वातीचा, पाण्याने दिवा डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते पेटवल व आगळे वेगळे पध्दतीने दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. प्रमोदीनी मंडपे यांनी अंनिस साथी यांनी रोचक कथा सांगून रीती, परंपरा निर्माण कशा होतात? हे सांगितले. 12 पुस्तके कशी उपयुक्त आहेत? हे सांगून एक गोष्ट सांगून मुलांना प्रोत्साहित केले. उदय चव्हाण यांनी लंगर सोडविण्याचे प्रत्यक्षिक दाखवून पाण्याचा दिवा पेटवण्यामागाचे विज्ञान सांगितले. शाळेस डॉ. दिपक माने यांनी एक संच भेट दिला. त्याचे रोज वाचन करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
समारोप्रसंगी अंनिसच्या सल्लागार प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या, मनाला पटणार्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. रूढी-परंपरेस मुठमाती दिली पाहिजे. उदय चव्हाण यांनी चमत्कारिक वैज्ञानिक प्रयोग कृतियुक्त सादर करून त्याची कारणमीमांसा सांगितली. सौ. गायत्री पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कुचेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सौ. अस्मिता कदम, सौ. गुरव, विशाल अडसूळ, स्वानंद हंडेकरी, उत्तमराव साळुंखे, सौ. अर्चना पंडीत, अंनिसचे कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व अध्ययनार्थी उपस्थित होते.
COMMENTS