Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देर आये दुरुस्त आये : ना. बाळासाहेब पाटील

केंद्र शासनाचे तिन्ही कृषी कायदे मागेसातारा / प्रतिनिधी : केंद्र सरकारने कृषी कायदा संदर्भात केलेले कायदे मागे घेण्याची जाहीर केल्यानंतर सहकार पण

राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरित करणार
शेतकर्‍यांचे वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार : सरकारचे नवे फर्मान
नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : मंत्री दिलीप वळसे पाटलांची ग्वाही

केंद्र शासनाचे तिन्ही कृषी कायदे मागे
सातारा / प्रतिनिधी : केंद्र सरकारने कृषी कायदा संदर्भात केलेले कायदे मागे घेण्याची जाहीर केल्यानंतर सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया नोंदवली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील याबाबत बोलताना म्हणाले, केंद्राने संमत केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. ते रद्द करण्यात यावेत, ही महाविकास आघाडी शासनाची पूर्वीपासून भूमिका होती. असे सांगून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, या कायद्याविरोधात देशभरात आंदोलन झाले. महाविकास आघाडी शासनाने सुध्दा या कायद्याचा अभ्यास करून धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्रात मंत्रिगटाची समिती गठित केली होती. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करून अनेक शेतकर्‍यांचा बळी गेला. ही दुर्दैवी बाब असल्याची खंतही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे. एपीएमसी बाहेर विक्री झाल्यास शेतकर्‍यांना त्याच्या मालाचा मोबदला मिळेल याची शाश्‍वती नव्हती. तसेच याबाबत विश्‍वासही नव्हता. किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. ई-नाम सारख्या ई-टेंडरिंग यंत्रणा बाजारावर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील? अशा अनेक अडचणींमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असते. म्हणून शेतकर्‍यांनी भारत बंदची घोषणा करून विरोध केला, आंदोलने केली. अनेक शेतकर्‍यांचा यामध्ये बळी गेला. या दुर्दैवी घटना घडल्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले आहेत. हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतू देर आये दुरुस्त आये असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

COMMENTS