मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्ला येथे कार्यरत असणारे उपअभियंता सतीश रामचंद्र आंबवडे यांचे नव-नवे प्रताप समोर येत आहे. बीडीडी चाळ, जे.जे.

मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्ला येथे कार्यरत असणारे उपअभियंता सतीश रामचंद्र आंबवडे यांचे नव-नवे प्रताप समोर येत आहे. बीडीडी चाळ, जे.जे. रूग्णालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतांनाच आंबवडे यांनी चेंबूर येथील हॉॅटेल सद्गुरूमध्ये तत्कालीन उप अभियंता सोनार यांना दमबाजी करून हा पदभार त्यांनी ताब्यात घेतला.
आंबवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून बीडीडी चाळ येथे व्यवस्थापक तथा उप अभियंता म्हणून कार्यरत असतांना तब्बल 30 कोटींचा गैरव्यवहार केला असतांनाच दुसरीकडे त्यांनी कुर्ला येथील पदभार स्वीकारण्यापूर्वी मोठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी कुर्ला येथील उपविभागाचा पदभार स्वीकारण्याची आंबवडे यांनी मोठी घाई केली. त्यासाठी त्यांनी तेथील कार्यरत असणारे उपअभियंता सोनार यांना दमबाजी करत, हा पदभार तात्काळ स्वीकारला. त्यामुळे आंबवडे यांच्या या कार्यप्रणावीवर संशय येत असून त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
उप अभियंता सतीश आंबवडे यांनी कुर्ला उपविभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून, त्यांनी याच उपविभागातील शाखा अभियंता हेमंत जाधव, आकाश लड्डा, तुषार व्हटकर आणि रमेश त्रिमुखे या शाखा अभियंत्यांना मानसिक त्रास देत त्यांनी कुठल्याही देयकांवर सही करू नये, यासाठी मज्जाव केला आहे. या चारही शाखा अभियंत्यांना दमबाजी करत आंबवडे यांनी नियमबाह्य कामकाजांचा धडाका लावला आहे. उप अभियंता आंबवडे यांचा एकीकडे कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांची याच उपविभागात एकाधिकारशाही सुरू आहे. त्यांच्या या दंडेलशाही आणि एकाधिकारशाही कारभाराला त्यांचेच सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वैतागले आहेत. त्यामुळे आंबवडे यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS