मुंबई प्रतिनिधी - मला आश्चर्य वाटत आहे की काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन सांगत होते, मला जिल्हाधिकाऱ्

मुंबई प्रतिनिधी – मला आश्चर्य वाटत आहे की काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन सांगत होते, मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आहे, बार्शीच्या आंदोलकांवर अजिबात लाठीचार्ज झाला नाही. सर्व काही शांतीने सुरू आहे. पण आपण पाहिलं असेल बार्शीच्या आंदोलकांवर ती महिला असो किंवा वृद्ध त्यांच्यावर लाठीमार केला.
आता मुख्यमंत्र्यांचे अधिकारी खोटी माहिती देतात. काही झालं नाही असं सांगतात.
एक तर मुख्यमंत्री डोळे झाक करत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही. अधिकारी त्यांना फसवत आहे. खोटी माहिती देते आहेत.
जर मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती जिल्हाधिकारी देत असतील तर त्यांना ताबडतोब बदललं पाहिजे.
देवेंद्र फडणवीस परदेशात आहे. तिथून ते वेगळे आदेश देत आहेत. काही झालं तरी आंदोलन वरती खेचून फरफटत बाहेर काढा.
हे कोण सांगत आहे? तर जे मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करायला गेलेले देवेंद्र फडणवीस सांगत आहे.
मुख्यमंत्री बोलत आहेत लाटी हल्ला झाला नाही. मी आदेश दिलेला नाही.
अशाप्रकारे हा गोंधळ सुरू आहे.
प्राण गेला तरी चालेल , आम्ही जमीन सोडणार नाही. असे स्थानिक बोलत आहेत.
70 टक्के आमच्या बाजूने आहेत. कसला सर्वे केला? लोक इथं मरण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत?
समन्वय कोणाशीच नाही आहे या सरकार मध्ये.
हे हिंदुत्ववादी सरकार एका इस्लामिक रिफायनरी साठी रत्नागिरी मराठी माणसांना भूमिपुत्रांची बेदम निर्घृण हत्या करत आहेत.
COMMENTS