Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधांची माहिती घेण्यास

औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! : मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
बा…विठ्ठला ! शेतकरी, कष्टकरी वर्गावरील संकटे दूर कर !
अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात एफडीआय आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानच्या कोयासन विद्यापीठाने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा केली. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांद्वारे जलसंधारण आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी भारत दौऱ्यात त्यांना ही पदवी देण्यात येणार आहे.

COMMENTS