भारतीय रुपया या चलनाचे सातत्याने होणारे अवमूल्यन चिंताजनक असून, यातून भविष्यातील धोक्याचे संकेत प्राप्त होत आहेत. रुपयाच्या घसरणीमुळे कच्च्या तेलाच्य
भारतीय रुपया या चलनाचे सातत्याने होणारे अवमूल्यन चिंताजनक असून, यातून भविष्यातील धोक्याचे संकेत प्राप्त होत आहेत. रुपयाच्या घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती, आयात करणार्या इॅलेक्ट्रानिक वस्तू, उपकरण, परदेशातील शिक्षण, परदेशातील प्रवास, मोबाईल उपकरण, वनस्पती तेल, खते, यासारख्या वस्तू पुन्हा एकदा महागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुपयांचे असेच अवमूल्यन होत राहिले तर, महागाई मोठया प्रमाणात वाढण्याचे संकेत यातून प्राप्त होत आहे.
एका डॉलरची किंमत आपल्यासाठी 80 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. भारताच्या परकीय चलनसाठ्यात सातत्याने घट होत आहे. भारताच्या परकीय चलनसाठ्यात 8.062 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. आता ते 580.252 अब्ज डॉलर झालं आहे. फॉरेन करन्सी अॅसेट अर्थात एफसीएमध्ये घसरण झाल्याने सर्वाधिक परिणाम झाला आहे, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं. गोल्ड रिझर्व्हमध्येही घट झाली आहे. 8 जुलैला एफसीएमध्ये 6.656 अब्ज डॉलरची घसरण झाली होती. आता हे 518.089 अब्ज डॉलरच्या पुढे गेले आहे. रुपया घसरणीमागे जागतिक स्तरावरील घडामोडी कारणीभूत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे आलेला जागतिक बाजाराचा दबाव हे रुपयाच्या कमजोरीचे सर्वात मोठे कारण आहे. जागतिक बाजारपेठेतील कमोडिटीवरील दबावामुळे गुंतवणूकदार डॉलरला प्राधान्य मिळत आहेत, कारण जागतिक बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये होतात. सततच्या मागणीमुळे डॉलर सध्या 20 वर्षांतील सर्वात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदार सध्या भारतीय बाजारातून सतत भांडवल काढून घेत आहेत, त्यामुळे परकीय चलन कमी होत आहे आणि रुपयावरील दबाव वाढत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिलपासून विदेशी गुंतवणूकदारांनी 14 डॉलर अब्ज भांडवल काढून घेतले आहे. परकीय चलन बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 79.98 वर उघडला, जो मागील बंदच्या तुलनेत 1 पैशांनी कमी होता. चलन विनिमय बाजार उघडताच रुपयाने घसरण दाखवण्यास सुरुवात केली आणि काही मिनिटांतच ऐतिहासिक घसरणीसह 80 पार करून 80.01 वर व्यवहार सुरू केला. जागतिक बाजारपेठेत डॉलरचे वर्चस्व आणि भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे. 2022 मध्येच डॉलरच्या तुलनेत रुपया 7 टक्क्यांनी घसरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सांगितले की 31 डिसेंबर 2014 पासून रुपयाचे अवमूल्यन 25 टक्क्यांनी घसरले आहे. यामध्ये जागतिक घटकाची मोठी भूमिका आहे. रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारपेठेतील खराब आर्थिक स्थिती यामुळे रुपयावर सर्वाधिक दबाव निर्माण झाला आहे.सर्वप्रथम रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग होईल कारण भारतीय आयातदारांना आता डॉलरच्या तुलनेत अधिक रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे भारत कच्च्या तेलाच्या एकूण वापरापैकी 85 टक्के आयात करतो, ज्यामुळे डॉलर महाग होईल आणि त्यावर दबाव येईल. इंधन महाग झाल्यास मालवाहतुकीचा खर्च वाढेल, ज्यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढतील आणि सर्वसामान्यांवर महागाईचा बोजाही वाढेल. परदेशात शिक्षण घेणार्यांवरही याचा परिणाम होईल आणि त्यांचा खर्च वाढेल, कारण आता त्यांना डॉलरच्या तुलनेत अधिक रुपये खर्च करावे लागतील. चालू खात्यातील तोटा वाढेल, जी आधीच 40 डॉलर अब्जांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 55 डॉलर अब्ज अतिरिक्त (सरप्लस) होते. रुपयांच्या घसरणीमुळे पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था गटांगळया खावू शकते. त्यामुळे रुपयाच्या घसरणीला त्वरित लगाम घालण्याची गरज आहे. अन्यथा रुपयाची घसरण अशीच चालू राहिली तर सावलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रसातळाला जावू शकते. तूर्तास इतकेच.
COMMENTS