निघोज प्रतिनिधी -प्रती पंढरपुर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांची दिंडी पिंपळनेर येथून प्रस्थान
निघोज प्रतिनिधी -प्रती पंढरपुर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांची दिंडी पिंपळनेर येथून प्रस्थान होणार आहे . निळोबारायांच्या पायी दिंडी सोहळ्यात लाखो वारकरी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झालेले दिसतात . या सोहळ्यात असंख्य वारकरी ’ एकोबा -तुकोबा -निळोबा -असा गजर करत पंढरीच्या दिशेने रवाना होतात .
या दिंडी सोहळ्यातील वारकरी यांना रस्त्यांनी कुठल्याच प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे .आणि पिंपळनेर येथून मंगळवारी संत निळोबा महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या दिमाखात होणार असल्याची माहीती निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली.
वारकर्यांना लागली पंढरीची आस – पंढरपुरच्या दिशेने एकदा वारकरी निघाला कि त्याची तहान, ऊन, भुक, पाऊस या गोष्टीचा विचार न करता पाऊले चालती पंढरीच्या वाटे या प्रमाणे तो चालतच राहतो.
COMMENTS