Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणी ते पिंपळगाव वाघा दिंडीचे प्रस्थान

भाळवणी : सालाबादप्रमाणे प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या आद्य जगतगुरू शंकराचार्य पिठ, पिंपळगाव वाघा येथे भाळवणी येथून श्री नागेश्‍वर पायी दिंडी सोह

रात्री प्रवाशांना लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले
उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
विजयादशमीला महापालिकेचे ढब्बू मकात्या महापालिका नामांतर करण्याचा निर्णय

भाळवणी : सालाबादप्रमाणे प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या आद्य जगतगुरू शंकराचार्य पिठ, पिंपळगाव वाघा येथे भाळवणी येथून श्री नागेश्‍वर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. ’ज्ञानबा – तुकाराम’ च्या जयघोषात भाळवणीकर ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्याला आनंदी वातावरणात निरोप दिला.
भाळवणी येथून वडगाव आमली, हिवरे बाजार मार्गे दिंडीचे मार्गक्रमण झाले. सकाळचा नाष्टा वडगाव आमली येथे ह.भ.प. दत्तात्रय पवार यांच्या तर्फे तर दुपारचे जेवण हिवरे बाजार येथील प्रा. सखाराम पादीर सर यांच्या निवासस्थानी करण्यात आले. या दिंडी सोहळ्यात ह.भ.प. बाबासाहेब दळवी, ज्ञानदेव रोहोकले, भाऊसाहेब रोहोकले, डॉ. राजेंद्र रोहोकले, रावसाहेब थोरात, भानुदास तरटे, सदाशिव पळसकर, बळीराम सुरसे, भाऊ रोहोकले, लक्ष्मण कपाळे, सचीन रोहोकले, गिताराम रोहोकले आदींसह भाविक सहभागी झाले आहेत. दिंडी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

COMMENTS