Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहमारे महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड

कोपरगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  14 सप्टेंबर

परप्रांतियाकडं मिळाले पिस्तुलासह पाच काडतुसे | DAINIK LOKMNTHAN
बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी मिळवी यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..

कोपरगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  14 सप्टेंबर रोजी शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा मुले व मुलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील 19 वर्षे वयोगटातील 05 मुले व 05 मुली अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी तलवारबाजी खेळातील विविध प्रकारात विजय प्राप्त केला आहे. या स्पर्धेतून एकूण 10 विद्यार्थ्यांची निवड पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली. या खेळाडूंच्या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीव दादा कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS