Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय बाबाजी भक्त परिवाराच्या तीर्थ कलशाचे अयोध्येकडे प्रस्थान 

ओझर प्रतिनिधी -  अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने संकलित करण्यात

नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत
एसटी कर्मचार्‍यांचा आक्रमक पवित्रा
अनियमित कोळसा पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती संकटात

ओझर प्रतिनिधी –  अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने संकलित करण्यात आलेले हजारो विहिरीचे जल तसेच सप्तसमुद्र व विविध पवित्र नद्यांचे जल कलश तसेच नाणे  कलशांची ओझर येथील जनशांती धाम येथे लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली.आणि ते कलश अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवण्यात आले.

         निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत ओझर येथील जनशांती धाम येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात तीर्थ मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. करोडो भारतीयांच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या अयोध्येतील प्रभु श्री रामचंद्रांच्या मंदीर लोकार्पण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जय बाबाजी परिवाराच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या हजारो विहिरींतील जल,सप्तसमुद्र व विविध पवित्र नदींचे तीर्थ तसेच नाण्यांच्या कलशाचे ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्राघोषात विधीवत पुजन करुन अयोध्येकडे पाठविण्यात आले.आश्रमिय संत ब्रम्हचारी नागेश्वरानंद महाराज,शिवाभाऊ अंगुलगावकर यांच्यासह काही विशेष भविकांच्या हस्ते हे  कलश अयोध्येत पाठवण्यात आले.तीर्थ मिरवणूक कार्यक्रमाच्या प्रारंभी पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्य नियम विधी,आरती,सत्संग,प्रवचन सोहळा संपन्न झाला.यानंतर देवभूमी जनशांती धाम येथील श्री बाबाजींच्या कुटिया परिसरातून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी आश्रमिय संत,विश्वस्त,कार्यकारी समिती, विविध आश्रम कमिटी सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.मिरवणुकीत शेकडो महिला व पुरुष भाविक तीर्थकलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात सदगुरू नाम व भगवान श्रीरामाचे नामस्मरण करत मोठ्या उत्साहात यावेळी तिर्थ मिरणवणूक संपन्न झाली.

COMMENTS