यवतमाळ/प्रतिनिधी ः यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूच्या संक्रमनाने थैमान घातले असून अनेक नागरिक आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात अनेकांना डेंग्यूची लागण झा
यवतमाळ/प्रतिनिधी ः यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूच्या संक्रमनाने थैमान घातले असून अनेक नागरिक आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून या आजाराने अनेकांचा जीव देखील गेला आहे. याच दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नेर-आर्णी मध्ये डेंग्यूच्या आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी तीन जणांचा बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
साहिल खांडेकर, कर्तव्य झांबरे (दोघेही रा. नेर) तर जागृती चव्हाण (रा. मालेगाव, आर्णी तालुका) अशी डेंग्यूने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची नावे आहेत. यवतमाळमध्ये डेंग्यू आजाराने एकाच दिवशी नेर आणि आर्णी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरु आहे. अजूनही हे संक्रमण आटोक्यात आलेले नाही. यवतमाळ, महागाव, मारेगाव या तालुक्यात आतापर्यंत डेंग्यूने अनेक लहान मुलांचा बळी घेतला आहे. यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नाही. आता आणखी तीन मुलांचा बळी गेला आहे.
COMMENTS