बीड प्रतिनिधी - बीड(Beed) जिल्ह्यातील वडवणी(Wadwani) शहरासह तालुक्यात डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. प्रत्येक गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. या
बीड प्रतिनिधी – बीड(Beed) जिल्ह्यातील वडवणी(Wadwani) शहरासह तालुक्यात डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. प्रत्येक गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये लहान मुलांची सर्वाधिक संख्या आहे. वडवणीच्या पिंपरखेड(Pimperkhed) गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेदिका भगवान साबळे(Vedika Bhagwan Sable) असं मृत चिमुकलीचे नाव आहे. याला आरोग्य विभागासह ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन देखील जबाबदार आहे. गावात अस्वच्छता, रस्त्यावर पाण्याचे डबके, मच्छर सह आदी प्रश्नांनी ग्रासले असल्याने यातूनच डेंग्यू सारखे आजार फोफावले असल्याचे बोलले जात असल्याने आरोग्य प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
COMMENTS