Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मणिपूर राज्या  मधील महिला अत्याचारांच्या विरोधात  धारूर मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने

धारूर प्रतिनिधी - मणिपूर राज्यातील कुकी आदिवासी महिलांची दिंड काढून महिलावर अत्याचार केल्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये महिला मध्ये असंतोष पसरला आ

रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन
शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण
शेवगावमध्ये हमालाचा असाही प्रामाणिकपणा

धारूर प्रतिनिधी – मणिपूर राज्यातील कुकी आदिवासी महिलांची दिंड काढून महिलावर अत्याचार केल्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये महिला मध्ये असंतोष पसरला आहे . त्याच अनुषंगाने आज धारूर मध्ये मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने वतीने धारूर येथील शिवाजी चौकामध्ये निदर्शने करण्यात आले . असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ डॉ अशोक थोरात यांनी प्रसिद्ध पत्रकात माहिती दिली.
केंद्र सरकारने वार्‍यावर सोडलेल्या मणिपुरी येथे भयंकर अत्यंत धक्कादायक घटना 4 मे 2023 रोजी मणिपूर राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यातील बी फाय नोम  गावा मध्ये घडली .पण इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कालच ती घटना उघडकीस आली . दोन कुकी  आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची दिंड काढली गेली . हाजारोचा जमाव नुसता बघत बसला नाही , तर त्या महिलांना नको तिथे किळसवाना स्पर्श करीत राहिले . पेशवांच्या काळातील घटकचुंकी सारख्या अत्यंत अशिल खेळालाही लाजविणारे आणि माणूस म्हणून आपली मान शरमेने खाली कायमची खाली घालायला लावणारी ही भयंकर घटना घडली .  त्यापैकी एका तरुण महिलेवर या नराधमाने सामूहिक बलात्कार ही केला 18 मे 2023 रोजी या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही दोन महिने झाले तरीही एकाही दोषी व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. तरी दोषी व्यक्तीला अटक करून त्यांना जास्तीत जास्त कठोर कार्यवाही  करावी .             यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी धारूर तालुक्याच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध नोंदविला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व परिसर घोषणाने दनानुन सोडला होता. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कार्याध्यक्ष  कॉ काशीराम शिरसाट .अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या निमंत्रक कॉ मीरा शिंदे , सौ  वैशाली अडसूळ , सौ लता खेपकर , भागीरथी पंतगे . सौ कोश्यालया शिंदे . सौ दैवशाला नखाते . कॉ लक्ष्मण डोंगरे कॉ संजय घोगरे कॉ शिवाजी अडसूळ . शिवाजी अडसूळ कॉ सर्जेराव पतंगे , किसन मुठाळ . किसान सभेचे तालुका सचिव कॉ दादासाहेब शिरसाट कॉ मधुकर चव्हाण कॉ लक्ष्मी चव्हाण कॉ सुर्यभान रिडे . कॉ कुसुम उजगरे . श्री माणिक चव्हाण इत्यादी सह अनेक कार्यकर्ते नी निषेध नोंदवता. या वेळी तहसिल कार्यालयाचे श्री दबडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले . असे दिलेल्या प्रशिद्धी पत्रकात तालुका सचिव कॉ डॉ अशोक थोरात . यानी माहिती दिली .

COMMENTS