Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑल इंडिया स्टुडंट्स व युथ फेडरेशनचे शेवगावात निदर्शने

शेवगाव तालुका ः नीट व युजीसी नेट परीक्षा घोटाळा विरोधात शेवगाव येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या वतीने निदर्शने करण्य

*Exclusive Interview : गर्भवती महिलांनी कोरोना संसर्गात घ्यावयाची काळजी व लसीकरणाबद्दलचे समज-गैरसमज | LokNews24*
माजी आमदार चौधरी यांना त्वरित अटक करावी-
पाथर्डी शहरातील  सोन्याचांदीचे व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्लाच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी पाथर्डी बंद

शेवगाव तालुका ः नीट व युजीसी नेट परीक्षा घोटाळा विरोधात शेवगाव येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या वतीने निदर्शने करण्यात आले. या वेळी नीट रद्द करा, नेट परीक्षा घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचार्‍यांना अटक करून सखोल चौकशी करा, शिक्षणातील भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा, सर्व प्रकारच्या परिक्षा शासकीय यंत्रणा मार्फतच घेण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या या वेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन चे माजी राष्ट्रीय महासचिव कॉ ड अभय टाकसाळ, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य निमंत्रक कॉ संजय नांगरे संदिप इथापे यांच्या सह पदाधिकारी प्रज्ञा उगले,अभी बोरुडे, अक्षय साखरे, यश बोरुडे, अजिंक्य लहासे, सूरज नागरे , राजेंद्र वाघमारे, रुद्र पवार, विश्‍वकर्मा अमरनाथ, बुचडे सार्थक, अमोल तुजारे, आदित्य लांडे,अफरोज शेख, ज्ञानेश्‍वर राशिनकर, सायली राहुल वरे ,राज राहुल वरे, ओम साखरे, आदित्य भुजबळ.आदिंनी सहभाग घेतला होता.

COMMENTS