कोपरगाव प्रतिनिधी ः नारंदी अग्रो फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी व गरुडा एअर स्पेस चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नउचारी शिंगणापूर येथी
कोपरगाव प्रतिनिधी ः नारंदी अग्रो फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी व गरुडा एअर स्पेस चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नउचारी शिंगणापूर येथील पंकज त्रंबक परजणे यांच्या ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाघ यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचून त्याचा त्यांना लाभ व्हावा यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 24 मार्च रोजी या ड्रोन व्दारे पिक फवारणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन जास्तीत जास्त शेतकर्यांनी या ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहनही वाघ यांनी केले आहे.
COMMENTS