समाज माध्यमांपासून लोकशाही धोक्यात!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समाज माध्यमांपासून लोकशाही धोक्यात!

देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला कोणत्याही राज्य

Nanded : विजयादशमी निमित्त आरएसएस कडून पथसंचलन (Video)
रेन्बो स्कूलमध्ये खो-खो स्पर्धांना सुरुवात
राजकारणातील चघळेगिरी

देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला कोणत्याही राज्यात सत्ता मिळवता आली नाही या उलट त्यांच्या हातात असलेली पंजाबची सत्ता देखील त्यांना गमवावी लागली. त्यानंतर काँग्रेसमध्ये घमासान होईल हे जवळपास निश्चित होते! त्या अनुषंगाने काँग्रेसचा जो संघर्ष किंवा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येतो तो म्हणजे गांधी कुटुंब विरुद्ध इतर काँग्रेस जण. मात्र, हा वाद कधीही यशस्वी होत नाही, हे मात्र तेवढेच सत्य आहे. तरीही एक मात्र खरे की सोनिया गांधी हे नाव काँग्रेसच्या या वादापेक्षा फारच वरचे आहे. कारण सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशाच्या राजकारणापासून स्वतःला आणि गांधी कुटुंबाला ही पूर्णपणे अलिप्त ठेवले होते. त्या काँग्रेस पासूनच नव्हे तर एकूणच राजकारणापासून लांब राहिलेल्या; परंतु अनेकदा काँग्रेसजन त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत असत आणि शेवटी काँग्रेस रसातळाला गेल्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले होते, हा देखील ताजा इतिहास आहे. मात्र आज आपल्याला जी चर्चा करायचे आहे ती काँग्रेसच्या एकूणच राजकीय ध्येयधोरणाची नव्हे आणि काँग्रेसच्या इतिहासाचीही नव्हे. तर आज सोनिया गांधी यांनी लोकसभेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावर काही चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. भारतीय लोकशाहीला समाज माध्यमांच्या माध्यमातून धोका निर्माण झाला असल्याचे वक्तव्य सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत केले. समाज माध्यमांचे मालक हे विदेशात राहून भारतीय लोकशाही मध्ये लोकांच्या मनात द्वेषाचे राजकीय नरे ट्यूब बसवण्यासाठी ते कथानक रचत असल्याचा अतिशय गंभीर आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकार पक्षाची हात मिळवणी करून समाज माध्यमांचा मालकवर्ग हा देशातील लोकशाहीला धोका निर्माण करीत असल्याच्या या वक्तव्याने देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रकारची खळबळ उडाली आहे हे निश्चित आपल्याला म्हणावे लागेल. समाज माध्यम हा सामान्य लोकांचा आवाज आहे असा सुरुवातीला आभास निर्माण करणारी समाज माध्यमे आणि त्यांचा मालक वर्ग हा खरेतर भांडवलदारांचा हस्तक नव्हे तर स्वतः भांडवलदार प्रवृत्तीचा आणि नव भांडवलदार झाल्यामुळे त्याला पैसा प्रथम व्यवसाय प्रथम आणि बाकी सगळं काही दुय्यम बनले आहे. निवडणुकीच्या काळात ही समाज माध्यमे त्या त्या देशात किंवा त्या त्या प्रदेशात काल्पनिक कथानक असून लोक माणसांमध्ये एक प्रकारे द्वेष भावना किंवा त्यांना मॅनेज करणाऱ्या सत्ता पक्षाच्या बाजूने संदेश देत राहतो हा सोनिया गांधींचा आरोप अतिशय गंभीर आणि तितकाच वास्तववादी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचा पराभव झाल्यानंतर ईव्हीएम चा पुनर्विचार देशांमध्ये पुन्हा सुरू झाला असला तरी ईव्हीएम पेक्षाही ज्या महत्वपूर्ण घडामोडी निवडणूक काळात घडविल्या जातात, त्यामध्ये समाज माध्यमांच्या मालकांना हाताशी घेऊन सत्तापक्ष आपले नरेटीव मतदारांमध्ये पेरत राहतो, हा एक सर्वात महत्त्वाचा बिंदू सोनिया गांधींच्या या वक्तव्यामुळे अधोरेखित झाला आहे. अर्थात, यापूर्वी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्या वेळी देखील सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे आरोप झाले; आणि त्या आरोपात तथ्य असल्याचे नंतर समोर आले होते. याचा विचार लक्षात घेतला तर, सोनिया गांधी यांनी केलेला आरोप हा काही बिनबुडाचा आरोप ठरू शकत नाही! सोनिया गांधी या केवळ आरोप करूनच थांबल्या नाहीत तर त्यांनी सरकार पक्षाने यावर गंभीर विचार करून हा पक्षातीत भाग असल्याचा मुद्दा ह तितक्याच ठामपणे मांडला आणि देशातील लोकशाही व्यवस्था ही परकीय समाज माध्यमांच्या मालकांच्या भांडवली हेतू असलेल्या प्रवृत्तीपासून वाचवावी, याची कळकळही त्यांच्या बोलण्यात निश्‍चितपणे जाणवते.

COMMENTS