Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी- अशोक गायकवाड

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

टाळेबंदीसारखे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश
पुणतांबा-वाकडी रस्त्यासाठी 9.63 कोटीची मान्यता
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे. त्यास मुक्त करून २६ जानेवारी पर्यंत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार करावे तसेच नगर शहरातील मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे या मागणीसाठी मनपा कार्यालयात अमरण उपोषण करताना अशोक गायकवाड, विजय भांबळ, धर्म चाबुकस्वार, प्रा.भिमराव पगारे, प्रा.निवृत्ति आरू, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत ठोंबे, अनंत लोखंडे, सुजित घंगाळे, अमित काळे, युवराज पाखरे, यशवंत भांबळ, देविदास धीवर, नितीन कसबेकर, चिंटू कानडे, नितीन कसबेकर, सुनील पाडळे, संतोष गाढवे, बाळासाहेब आव्हाड, गुलाब गाडे, वीर सोनवणे, शिवाजीराव पालवे, अजिंक्य भांबळ, उत्तमराव साठे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धकृती पुतळा योग्य ठिकाणी स्थलांतर करून त्याचे पावित्र्य राखावे तसेच नगर शहरातील टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ण बांधणी नव्याने करून सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायाम शाळा, जिम याची निर्मिती करावी तसेच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्यांक विभाग भारत सरकार यांच्या योजनेतून महापालिकेने त्यांचे मौजे पिंपळगाव माळवी येथील तलावानजीक १० एकर जागेत मेडिटेशन हॉल बांधावे तसेच नगर शहरातील सामाजिक न्याय भवन सावेडी येथील जागेची संरक्षण भिंत बांधून प्रवेशद्वारासाठी उपलब्ध निधीचा वापर करून जनतेची देखणी वास्तु सुरक्षित करावी या विविध मागणीसाठी मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे.

COMMENTS