Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आखोणी सेवा सोसायटीतील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी

कर्जत : कर्जत तालुक्यातील आखोणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी संदर्भात हनुमंत लक्ष्मण सुळ यांनी  दि. 16 जानेवारी 2

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
तब्बल 22 वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर जेरबंद
स्व. दिलीप गांधी यांनी अर्बनच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला : खा.सुजय विखे

कर्जत : कर्जत तालुक्यातील आखोणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी संदर्भात हनुमंत लक्ष्मण सुळ यांनी  दि. 16 जानेवारी 2024 रोजी सहायक निबंधक कार्यालय कर्जत यांना पत्र दिले. सोसायटीत झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषण सोडताना सहायक निबंधक कर्जत यांनी पत्र देवून 15 दिवसांत भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी करतो असे लेखी आश्‍वासनाचे पत्र दिलेले होते. परंतु यामध्ये माझी फसवणूक झाली असून त्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात आलेली नाही. फक्त वर वर चौकशी होवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे गोरगरीब जनतेची शेतकर्‍यांची हेळसांड होत आहे. त्यांची आर्थिक लुटमार  प्रशासन करीत आहे. प्रशासन हे गोरगरीब शेतकरी यांना न्याय देण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. आम्ही संबंधीत सोसायटीचे अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला उत्तरेही मिळत नाहीत. उलट दमदाटीची भाषा वापरली जाते. आम्ही तालुक्यापासून जिल्हयापर्यंतच्या सर्व अधिकार्‍यांना हप्ते देतो त्यामुळे आमचे कोणीही काही करु शकत नाही, अशी उगरट भाषा आम्हाला वापरली जाते व अशा प्रकारे सोसायटीचे अधिकारी हे शेतकर्‍यांची पिळवणूक व आर्थिक लुटमार करीत आहेत. या अधिकार्‍यांची सखोल चौकशी करुन ज्या शेतकर्‍यांची फसवणूक झालेली आहे त्या शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मी 1 जुलै 2024 पासून धरणे आंदोलन करणार आहे. याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असे हनुमंत सुळ व इतर शेतकर्‍यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

COMMENTS