Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आज बुधवार, दि. 1 जून रोजी वर्धापनदिन होत आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गाव

दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा
Osmanabad: मांजरा नदी मध्ये 17 जण अडकले
एसटी बसद्वारे आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थानl LokNews24

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आज बुधवार, दि. 1 जून रोजी वर्धापनदिन होत आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली विद्युत ई-शिवाई बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. दरम्यान, सातारा विभागाने सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सुरु करण्याचे नियोजन ठेवले असून याबाबतची मागणी महामंडळाकडे केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सातारा विभागाने लढवलेली शक्कल आता ई-शिवाई बसच्या माध्यमातून पुर्ण होणार का? या कडे जाणकारांचे लक्ष लागले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात एसटी महामंडळाने आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबवण्याच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहनांना नोंदणीदरम्यान विविध करातून 100 टक्के सूट दिली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे वाढते दर यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करताना महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढत्या इंधन दरामुळे अलीकडे नागरिकांचा कल ई-बाईक्स व ई-वाहने खरेदी करण्याकडे वाढला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाप्रमाणे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात घेण्याच्या तयारीला लागले आहे.
राज्यातील एसटीची पहिली बस सेवा पुणे-नगर मार्गावर 1948 मध्ये सुरु झाली होती. त्यामुळे दि. 1 जून रोजी एसटी महामंडळाची पहिली ई-बस पुन्हा पुणे-नगर मार्गावर धावणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने सुमारे 85 ई-शिवाई बसची मागणी महामंडळाकडे केली आहे. ई-शिवाई बस सातारा-स्वारगेट मार्गावर धावणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच ग्रामीण भागातील जास्त उत्पन्न देणार्‍या जवळच्या मार्गावर ई-बस सोडण्याचे नियोजन सातारा विभागाने केले आहे. प्रदुषणाविना चालणार्‍या या बस अधिक सुरक्षित आणि चांगला प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देणार आहेत.
पुणे-नगर मार्गावर ई-शिवाई बसला कसा प्रतिसाद मिळतो. याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील इतर मार्गावर ई-शिवाई बसचा विस्तार वाढवण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. मात्र, सातारा विभागाने ई-शिवाई बसची मागणी केली असून महामंडळामार्फत त्याला हिरवा कंदील कधी मिळेल. मात्र, त्यासाठी संबंधित विभाग चार्जिंग पाईंट कोठे उभारणार? असे विविध प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

COMMENTS