Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इन्स्टाग्रामच्या फोटोत छेडछाड़ करून व्हीडीओद्वारे बदनामी

पैशांचीही केली लूट, मिलिटरी हॉस्पिटलमधील डॉक्टरची पोलिसात तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील भिंगार कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमधील डॉक्टरचे इन्स्टाग्रामवरील फोटो व चॅटिंग चोरून व त्यामध्ये छेडछाड करून त्याचा व्हिडीओ

शेतीसाठी वीज पुरवठा खंडित करू नका
बोठेला पकडणार्‍या हैदराबादकरांचा गौरव ; नगरच्या पोलिसांनी दिले प्रशंसापत्र
पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील भिंगार कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलमधील डॉक्टरचे इन्स्टाग्रामवरील फोटो व चॅटिंग चोरून व त्यामध्ये छेडछाड करून त्याचा व्हिडीओ तयार केला गेला व तो त्यांच्या इन्स्टाग्रामवरील मित्र-मैत्रिणींना पाठवून त्यांची बदनामी केली. शुक्रवारी (दिनांक 17 मार्च) हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉक्टरने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अर्चिता गुप्ता या नावाने इन्स्टाग्राम अकौंट असलेल्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा व्हीडीओ डिलीट करण्यासाठी 43 हजार रुपये पाठवले तरी तो व्हीडीओ डिलीट केला गेला नाही. त्यामुळे बदनामीसह आर्थिक लूटही या प्रकरणात घडली आहे. पोलिस आता संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी हे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील अकौंटवरून त्यांचे खासगी फोटो व चॅटिंग चोरली आणि त्यामध्ये छेडछाड करून त्याचा व्हिडीओ तयार केला गेला. तो व्हिडीओ फिर्यादीच्या इन्स्टाग्रामवरील मित्र-मैत्रिणींना पाठविला गेला. हा व्हिडीओ शुक्रवारी रात्री 12.06 वाजता फिर्यादीच्या मोबाईलवर आला. फिर्यादी यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क केला असता, ‘तुम्हाला जर हा व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर मला होल्डर नाम राहुलकुमार असे असलेल्या एका मोबाईल नंबरवर 21 हजार 500 रुपये पाठवा’, असे त्या फोनवरील व्यक्ती म्हणाली. फिर्यादी यांनी तात्काळ 21 हजार 500 रुपये संबंधित नंबरवर पाठविले असता काही वेळाने पुन्हा फोन आला व पुन्हा 21 हजार 500 रुपये मागितले. फिर्यादी यांनी पुन्हा 21 हजार 500 रुपये पाठविले. पण, फिर्यादी यांनी समोरच्या व्यक्तीला 43 हजार रुपये पाठवून देखील त्यांचा मित्र-मैत्रिणींना पाठविलेला व्हिडीओ डिलीट केला नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून फिर्यादीची बदनामी करून त्यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS