Homeताज्या बातम्यामनोरंजन

दीपिकाच्या जस्ट लुकिंग वॉव व्हिडिओने मोडलं रेकॉर्ड

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळ स्थ

रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.
दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण
दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळ स्थान मिळवलं आहे. केवळ भारतातच नाही तर जगभर दीपिकाचे चाहते आहेत. तिला सोशल मिडियावर फॉलो करणाऱ्या लोकांची संख्याही काही कमी नाही. अलिकडेच दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक तिची एक रिल शेयर केली होती. जी काही तासातच व्हायरल झाली आणि आता या रिलने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाने ‘जस्ट लुकिंग…’ या व्हायरल ट्रेंडवर तिचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर हा मजेदार व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे ‘जस्ट लुकिंग….. हे पुन्हा ट्रेंड होऊ लागलं. त्यानंतर हॉलिवूडच्या अभिनेत्रीनेही यावर व्हिडिओ केला. दीपिकाच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांपासून तर अनेक कलाकारांपर्यंत सर्वांनी कमेंट केल्या होत्या. आता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 193 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या यासोबतच दीपिकाचा हा व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. इतकच नाही तर या रीलने सलमान खानच्या ‘टायगर 3’च्या ट्रेलरचा व्ह्यूजचा विक्रमही मोडला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र दीपिकाची चर्चा सुरु आहे. खर तर दीपिकाने हा व्हिडिओ तिच्या ट्रोलर्ससाठी शेयर केला होता. अलिकडेच दीपिका ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसली होती. यादरम्यान दीपिकाने रणवीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल स्पष्टपणे बोलली होती त्यामुळे ती ट्रोल झाली होती. दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला आतापर्यंत 191 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘फाइटर’ हा चित्रपट 2024 ला प्रजासत्ताक दिनी ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘द इंटर्न’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात काम करणार आहे.

COMMENTS