मुंबई प्रतिनिधी - रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या

मुंबई प्रतिनिधी – रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जामनगरमध्ये जंगी प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देश-विदेशातील अनेक कलाकार , दिग्गज मंडळी, व्यावसायिक उपस्थित होते. रविवारी कार्यक्रमाचा तिसरा दिवस पार पडला.
या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी स्टेजवर आपल्या नृत्याची झलक दाखवली. यावेळी सलमान, शाहरुख, आमिरपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान देखील डान्स करताना दिसल्या. दरम्यान, यावेळी स्टेजवर रणवीर सिंह आणि प्रेग्नेंट असलेली दीपिका पादुकोण देखील नाचताना दिसली. दीपिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दीपिकाने ती गरोदर असल्याचा खुलासा सोशल मीडियाद्वारे केला होता. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या बाळाला जन्म देणार आहे. मात्र, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दीपिकाने रणवीरसोबत स्टेजवर परफॉर्मन्स केला. यावेळी दीपिका अतिशय काळजीपूर्वक डान्स करताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. तर काहीजण ती प्रेग्नेंट असूनही डान्स करत असल्याने तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
COMMENTS