Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार

पुणे प्रतिनिधी - पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्य पिंजऱ्यातुन सोमवारी बिबट्या पसार झाल्याची माहिती समोर आली. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्

अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीचे माठ, रांजण विक्रीसाठी बाजारात दाखल
पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  

पुणे प्रतिनिधी – पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्य पिंजऱ्यातुन सोमवारी बिबट्या पसार झाल्याची माहिती समोर आली. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यातील बिबट्या पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आला होता. त्यानंतर गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा  बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. तसेच प्राणी संग्रहालय बंद ठेवून बिबट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. या प्राणी संग्रहालयात तीन मादी व एक नर बिबट्या आहेत. हंपीहून आणलेला नर बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. 

तसेच पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचे नाव “सचिन” आहे. यावेळी “सचिन” सी सी टिव्हीमध्ये कैद झाला असून नागरिकांनी काही काळजी करू नये, भीतीचे कारण नाही असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आज सकाळी तो संग्रहालयातील बॅटरी भागात दिसून आला बिबट्याचा शोध घेण्यासाठी 200 जणं तैनात करण्यात आले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रॉनचे वापर देखील करण्यात येणार आहे 

COMMENTS