Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीपफेक लोकशाहीसाठी गंभीर धोका ः रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव

मुंबई ः डीपफेक जगभरातील लोकशाही आणि सामाजिक संस्थांसाठी एक गंभीर धोका म्हणून उदयास आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे डीपफेक सामग्रीच्या प्रसा

चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल
राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू
‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई ः डीपफेक जगभरातील लोकशाही आणि सामाजिक संस्थांसाठी एक गंभीर धोका म्हणून उदयास आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे डीपफेक सामग्रीच्या प्रसारामुळे हे आव्हान आणखी वाढले असून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने वेळोवेळी, सोशल मीडिया मध्यस्थांना योग्य परिश्रम घेण्याचा आणि डीपफेक विरुद्ध जलद कारवाई करण्याचा सल्ला दिला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी केले आहे.
गुरूवारी मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी डीपफेकला प्रभावी प्रतिसाद मिळावा यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था आणि सोशल मीडियातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान सहमती झाली की सरकार, शैक्षणिक संस्था, सोशल मीडिया कंपन्या आणि छ-डडउजच् डीपफेकला प्रतिसाद देण्यासाठी संयुक्तपणे कार्य करतील. पुढील 10 दिवसांच्या आत खालील 4 गोष्टींवर कारवाई करण्यायोग्य बाबी ओळखल्या जातील यावरही सहमती झाली. या चार बाबी म्हणजे, अशी डीपफेक पोस्ट करण्यापूर्वी आणि नंतर डीपफेक सामग्री शोधली पाहिजे, तसेच डीपफेक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा असावी. यासोबतच प्रभावी आणि जलद अहवाल आणि तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध असावी, डीपफेकच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली पाहिजे. तसेच पुढे, तात्काळ प्रभावाने, डीपफेकच्या धोक्याला आळा घालण्यासाठी चशळींध आवश्यक नियमांचे मूल्यांकन आणि मसुदा तयार करण्यासाठी एक उपक्रम सुरू करेल. या उद्देशासाठी, चशळींध चूर्ॠेीं पोर्टलवर लोकांकडून टिप्पण्या मागवेल. स्तंभांच्या संरचनेला अंतिम रूप देण्यासाठी डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात संबंधित भागधारकांसह पाठपुरावा बैठक पुन्हा आयोजित केली जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि जनजागृती वाढवून डीपफेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचे यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले.

COMMENTS