अंबाजोगाई प्रतिनिधी - गेल्या बावीस तेवीस दिवसापासुन पावसानं उघडीप दिल्याने मराठवाड्यासह बीड जिल्हयातील पिके वाळू लागली आहेत अशा परिस्थितीत चिंता
अंबाजोगाई प्रतिनिधी – गेल्या बावीस तेवीस दिवसापासुन पावसानं उघडीप दिल्याने मराठवाड्यासह बीड जिल्हयातील पिके वाळू लागली आहेत अशा परिस्थितीत चिंतांतुर शेतकरी वर्गाला दिलासा देणं सरकारचे काम असतांना अद्यापपर्यंत सरकारकडुन कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत. शेतकर्यांची डोळे आभाळाकडे लागली आहेत. सरकार काही तरी मदत देईल ही अपेक्षा लागुन राहीली आहे. पावसांनं पाठ फिरवल्यानं व सरकारनं अनास्थेचं धोरण स्विकारल्यानं शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीमुळे मनसेच्या वतीने आज अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करून कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकर्यांना तत्काळ मदत जाहीर करा, विमा रकमेच्या पंचवीस टक्के विमा रक्कम अग्रीम म्हणुन देण्यात यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, वन्य प्राण्यांपासुन झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत तत्काळ मदत करा आदी मागण्या करण्यात आल्या. या निदर्शने आंदोलनात सरकार वीरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश काळे, उपजिल्हाध्यक्ष कल्याण केदार, मनविसे उपजिल्हाध्यक्ष नितीन परदेशी , शहर अध्यक्ष गणेश अप्पा बरदाळे, ता. उपाध्यक्ष रमेश आडे, केज तालुका अध्यक्ष गणेश कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष दत्ता दहिवाळ,परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथर कर, परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, ता. उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ता. उपाध्यक्ष यशवंत राजे भाउ, ता. उपाध्यक्ष विलास शिंदे, अंबाजोगाई विद्यार्थासेना ता. अध्यक्ष श्री कुलकर्णी, आमोद कुलकर्णी, विठ्ठल झीलमेवाड, सचिन जाधव, राजेश कोकाटे, विशाल सोनटक्के, यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
COMMENTS