मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या मुद्याला वेग येतांना

मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या मुद्याला वेग येतांना दिसून येत आहे. येत्या एक ते दोन दिवसात ठाकरे आणि शिंदे गटाला राहुल नार्वेकर यांच्याकडून नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला येत्या दोन दिवसात नोटीस पाठवली जाणार आहे.
या दौर्यादरम्यान ते वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकर यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष लवकरच नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे. आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांना आपली बाजू एक-दोन आठवड्यामध्ये मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादा दिली नाही. पण न्यायालयाने सांगितले की, ही कारवाई थोडी जलद गतीने करा. यासाठी प्रक्रिया डावलून कारवाई करा, असे म्हटले नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे ही कारवाई करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होईल, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
भाजपकडून प्लॅन बी तयार – विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पहिला पर्याय असणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत 105 आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे 40 आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
COMMENTS