Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या जिल्हा नामातरांचा निर्णय आजच्या बैठकीत घ्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून मागणी

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नाव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात

अहमदनगर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरुवात : आमदार संग्राम जगताप
नगर शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफी द्यावी : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
रेणुका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान – आ. संग्राम जगताप

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नाव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या वतीने तसेच सर्व धनगर समाज बांधव आणि सर्व संघटनांनी वेळोवेळी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहे, तरी आज बुधवारी होणार्‍या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत हा नामकरणाचा विषय घेवून मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनगर समाजाचे नेते आमदार दत्ता भरणे यांनी निवेदनातून केली, यावेळी आ. संग्राम जगताप, आ. नितीन पवार,  सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते. आ. दत्ता भरणे म्हणाले की, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून नगर जिल्ह्याला त्यांचा इतिहास लाभला आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीनगर करून लोकभावनेचा आदर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

COMMENTS