Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन आल्याने खळबळ

मुंबई/प्रतिनिधी ः देशातील महत्वाच्या नेत्यांना धमकी देण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे

आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात
शरद पवारांना धमकी देणारा अटकेत
राज्यात मविआला 30-35 जागा मिळतील

मुंबई/प्रतिनिधी ः देशातील महत्वाच्या नेत्यांना धमकी देण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.
या धमकीची पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी धमकी देणार्‍याचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट शरद पवारांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी फोन करून पवारांना देशी कट्टयाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात पवारांच्या निकटवर्तीयांनी मुंबईतील गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. शरद पवारांचा कालच वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर त्यांची हत्या करण्याबाबत धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना धमकीचा फोन बिहारमधून आला होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात पेटलेल्या सीमावादाच्या प्रकरणात शरद पवारांनी थेट आणि रोखठोक भूमिका घेतल्यानेच त्यांना धमकीचा फोन आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही शरद पवारांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एका व्यक्तीला पोलिासांनी बिहारमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा बिहारमधून धमकीचा फोन आल्याने पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS