पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यात आत्मघातकी हल्ल्याचा इशारा देणारे पत्र केरळ भाजप प्रदेश समिती कार्यालयात पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यात आत्मघातकी हल्ल्याचा इशारा देणारे पत्र केरळ भाजप प्रदेश समिती कार्यालयात पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. केरळ पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी धमकीच्या पत्राचा तपास तीव्र केला आहे. जोसेफ जॉन नादुमुथामिल नावाच्या व्यक्तीकडून ते पाठवण्यात आले, जो मूळचा एर्नाकुलमचा आहे. आठवडाभरापूर्वी भाजपच्या प्रदेश समितीच्या कार्यालयात हे पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी केरळ दौऱ्यापूर्वी सुरक्षतेची चिंता वाढली आहे. एडीजीपी इंटेलिजन्सने तयार केलेला सुरक्षा आराखडा लीक झाला होता. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यानच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची माहितीही लीक झाली होती. हा ४९ पानांचा अहवाल होता, ज्यात व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत सर्वसमावेशक माहिती होती. पंतप्रधान ज्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत, त्या जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाच हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यानंतर अधिकाऱ्यांनी आवश्यक ते बदल करून नवीन सुरक्षा योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केरळ पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा हत्येच्या धमकीच्या पत्राचा कसून तपास करत आहेत.
COMMENTS