Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी

मुंबई ः काँग्रेस नेते आणि मालाड पश्‍चिमचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा फोन करणार्‍या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्ट

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागलीl पहा LokNews24
म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा ; खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

मुंबई ः काँग्रेस नेते आणि मालाड पश्‍चिमचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा फोन करणार्‍या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार म्हणून केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंबईच्या मालाडमध्ये बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोल्डी ब्रार हा कॅनडचा असून सध्या फरार आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्‍नोईशी त्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे गोल्डी ब्रार पोलिसांच्या रडारवर आहे. एवढेच नव्हेतर गोल्डी ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खान यालाही धमक्या दिल्या होत्या. अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विक्रम कपूरच अस्लम शेख यांना आलेले फोन उचलतात. अस्लम शेख यांना 5 ऑक्टोबर रोजी फोन आला असल्याची माहिती कपूर यांनी तक्रारीत दिली आहे. फोन करणार्‍याने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी करून दिली. मी गोल्डी ब्रार बोलत आहेत. मी अस्लम शेखला दोन दिवसांत गोळ्या घालून मारणार आहे. हे अस्लम शेखला सांगा, असा फोन विक्रम कपूर यांना आला. हा फोन येताच कपूर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. फोनचे तपशीलही त्यांनी पोलिसांना दिले आहेत. कपूर यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 506(2) आणि 507 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पुढील तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.

COMMENTS