Homeताज्या बातम्यादेश

आठ नौदल अधिकार्‍यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली ः कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 भारतीय नौदल अधिकार्‍यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही शिक्षा तुरुंगावासात रूपांतरित करण

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)
तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी – विवेक कोल्हे

नवी दिल्ली ः कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 भारतीय नौदल अधिकार्‍यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही शिक्षा तुरुंगावासात रूपांतरित करण्याचा निर्णय कतारने घेतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला.
कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला. ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारमधील भारतीय राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते, त्यांनी अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांसह न्यायालयात दाद मागितली होती. कतारमधील कथित हेरगिरीचा आरोप ठेवत या अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कतारच्या अपील न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय घेतला. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. सुनावणीवेळी भारताचे राजदूत न्यायालयात हजर होते. सर्व 8 कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत होते. भारताने यासाठी विशेष परिषद नेमली होती. मात्र, या निर्णयाची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक लेखी निवेदन जारी केले आहे. यामध्ये फाशीची शिक्षा तुरुंगात बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. निवेदनानुसार, कतारच्या अपील न्यायालयाने ’दहरा ग्लोबल केस’मध्ये 8 माजी भारतीय नौसैनिकांची शिक्षा कमी केली आहे. निर्णयाच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी आज न्यायालयात हजर होते. याशिवाय सर्व खलाशांची कुटुंबेही तेथे होती. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरुवातीपासून उभे आहोत आणि भविष्यातही कॉन्सुलर ऍक्सेससह सर्व मदत करू. याशिवाय आम्ही या मुद्द्यावर कतार प्रशासनाशी चर्चा सुरू ठेवू. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी कतारमध्ये उपस्थित असलेले भारतीय राजदूत निपुल यांनी आठ माजी नौसैनिकांची भेट घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बडची यांनी ही माहिती दिली. बागची म्हणाले होते- माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध आम्ही अपील केले होते. यानंतर दोनदा सुनावणी झाली. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. त्यांना सर्व कायदेशीर आणि कॉन्सुलर मदत दिली जात आहे.

अधिकार्‍यांवर हेरगिरीचा संशय – 26 ऑक्टोबर रोजी कतार न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली. या आठ भारतीयांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. अल-जझिराने दिलेल्या वृत्तानुसार, या आठही जणांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.

COMMENTS