Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू

शिराळा / प्रतिनिधी : मांगले, ता.शिराळा येथील दादासो रामचंद्र चौगुले यांना मुलांच्या प्रेम प्रकरणातून नातेवाईकांनी वीजेच्या खांबाला दोरीने बांधू

कराड तहसिल कार्यालयातील त्या प्रकरणात कोण-कोण अडकणार?
प्रचार फेरीच्या माध्यमातून राजवर्धन पाटील यांचा मतदारांशी संवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा

शिराळा / प्रतिनिधी : मांगले, ता.शिराळा येथील दादासो रामचंद्र चौगुले यांना मुलांच्या प्रेम प्रकरणातून नातेवाईकांनी वीजेच्या खांबाला दोरीने बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्या मध्ये वडील मयत झाले. मुलाच्या वाडिलांना व आईला मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी केली. मारहाणीनंतर मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर (रा. मांगले) या चौघांना अटक केली असून अन्य आठ जणांच्या विरुध्द शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पहाटे प्रेम संबधातून पळवून नेले. त्यांनतर दादासो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटर सायकल वरून जनावरांचे दुध काढण्यासाठी धनटेक वसाहत येथील जनावरांच्या शेडवर गेले. दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळ जवळ आहेत. दादासाहेब चौगुले दुध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा घेवून गेला आहे. ते कोठे आहेत ते सांगा त्यावेळी आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला माहिती नाही असे सांगितले. त्यावेळी सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहानीनंतर दादासाहेब चौगुले बेशुध्द पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना येथील खसगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांना पुढे घेवून जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत अटक करण्यात आलेल्या चार संशयितांच्यासह कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रविण पाटील, प्रविण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (रा. मांगले) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दादासो चौगुले यांचा मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सिध्देश्‍वर जंगम हे करत आहेत. ही घटना समजताच दादासाहेब चौगुले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालय आवारात सकाळपासून गर्दी केली होती. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

COMMENTS