बुलढाणा प्रतिनिधी - बुलडाण्यात विजेचा शॉक लागून दोन तमाशा कलावंतांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पान्हेरा ख
बुलढाणा प्रतिनिधी – बुलडाण्यात विजेचा शॉक लागून दोन तमाशा कलावंतांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात ही घटना घडली आहे. तमाशाचा फड उभारताना हा अपघात झाला. पान्हेरी खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. दोन दिवसांच्या असणाऱ्या या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी तमाशाचे फड उभारणे सुरू असतानाच मोठी दुर्घटना घडली. जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कलावंत तमाशाचा फड उभा करत असताना हातातील लोखंडी पायपाचा विद्युत तारेला संपर्क झाला. यामध्ये शॉक लागून कलावंत अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
COMMENTS