बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी ः मंगलगेट पोलिस चौकीच्या मागे 50 वर्षीय अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

2018 मध्ये टीईटीच्या 600-700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क | DAINIK LOKMNTHAN
नगरकरांनो, काम चालू…स्टेशन रोड राहणार बंद ; उड्डाणपुल व पाईपलाईन कामामुळे रविवारपासून वाहतुकीत होणार बदल
मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः मंगलगेट पोलिस चौकीच्या मागे 50 वर्षीय अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता औषध उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दिनांक 11 सायंकाळी घडली. मंगलगेट परिसरात असलेल्या मंगलगेट पोलीस चौकीच्या मागे 50 वर्षीय अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यास अ‍ॅम्बुलन्स चालक विजय तुपे याने उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार सुनील आंधळे करीत आहे. पोलिसांना मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय सुमारे पन्नास वर्षे, शरीर बांधा मजबूत, उंची 171 सेंटीमीटर, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, पांढरी दाढी खुरटी, अंगात काळे रंगाचे जर्किंग, राखाडी रंगाचा टी-शर्ट, नेसणीस काळे रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या अनोळखी मृत व्यक्तीस अगर त्यांच्या नातेवाईकांना कोणी ओळखत असेल तर त्यांनी तोफखाना पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416118) येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

COMMENTS