Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी

पाथर्डी ः मढी ते देवी धामणगाव रोडवर अपघात होऊन सहा नाथ भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते त

अपघातात नवजात बाळाचा मृत्यू
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

पाथर्डी ः मढी ते देवी धामणगाव रोडवर अपघात होऊन सहा नाथ भाविक जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढी उपचारासाठी अहमदनगर पाठवण्यात आले परंतु त्यातील एक इसमाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत प्राथमिक समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मढी शिवारात कुटे वस्ती जवळ प्रवासी वाहतूक रिक्षा व अज्ञात वाहन यांच्या धडकून होऊन रिक्षामधील विजय यशवंत त्रिभवन वय 54 ( देवराव रंगारी ता.कन्नड जि. छ. संभाजीनगर), लाया भगवंत चव्हाण वय 75 (रा. लातूर ),अनिल गुलाब काळे 70 (गव्हाणवाडी श्रीगोंदा ),भाऊसाहेब बाबुराव गवते वय 55 (तांदळा बीड),गंगुबाई बाबासाहेब माहानवर वय 62 ( पाचुंदा)व एक अनोळखी पुरुष वय 55 असे सहा प्रवासी जखमी झाले आहे.प्रवासी वाहतूक रिक्षा मढी वरून पाथर्डी कडे येत असताना हा अपघात झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आजिनाथ बडे,सुहास गायकवाड,गोरक्ष आठरे यांनी जखमींना उपचार कामे पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

COMMENTS